एक प्यार नगमा है’ या गाण्यामुळे रानू मंडल रातोरात स्टार बनली होती. आपण कधी बॉलिवूडसाठी गाणी गाऊ हा विचार सुद्धा रानू मंडलने स्वप्नातही केला नव्हता. पण पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणी गात भीक मागणा-या रानूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओने रानू एका रात्रीत स्टार झाली. हिमेश रेशमियाने रानूला त्याच्या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली आणि रानू सगळ्यांच्या डोळ्यांत भरली. पण नियतीची चक्रे पुन्हा उलटी फिरली आणि रानू पुन्हा पूर्वीच्या आयुष्यात परतली. होय, सध्या रानू आर्थिक संकटाचा सामना करतेय. कोरोना महामारीच्या काळात तिच्या आयुष्याची आर्थिक घडी पुन्हा बिघडली. सध्या तिच्याकडे काहीही काम नाही आणि यामुळे ती चिंतीत आहे.
#RanuMandalLife #RanuMandalSinger #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber